आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egyptian Student 3 Years Jail For Declared His Atheist On Fb

Facebook वर नास्तिक असे स्टेटस अपडेट केलेल्या विद्यार्थ्याला इजिप्तमध्ये तीन वर्षांची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहिरा - फेसबूकवर नास्तिक असल्याचे स्टेट्स अपडेट करणे इजिप्तमधील एका विद्यार्थ्याला भलतेच महागात पडले आहे. इजिप्तमध्ये एका विद्यार्थ्याने असे स्टेटस अपलोड केल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनीच त्याची तुरुंगात रवानगी केल्याचा प्रकार समोर आला आहे. धर्माचा अवमान केल्याप्रकरणी या मुलाला तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इजिप्तमधील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणा-या करीम अल-बन्ना नावाच्या एका विद्यार्थ्याबरोबर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी करीमला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर त्याची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली.
या प्रकरणाशी संबंधित दुस-या वकिलांनी सांगितले की, सुनावणी दरम्यान विद्यार्थ्याच्या वडिलांनी त्याच्या विरोधात साक्ष दिली होती. मुलाने इस्लामला नाकारल्याने मला शरमेने मान खाली घालावी लागली असल्याचे ते म्हणाले. इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूडच्या पाठिंब्यावरील सरकार आणि राष्ट्रपती मोहम्मद मोरसी यांना हटवल्यापासून 'धर्माचा अवमान' होण्याचे प्रकार वाढले आहेत.

मित्राने केली अटक करण्यास मदत
या विद्यार्थ्याच्या शेजारी राहणा-याने त्याने फेसबूक स्टेटस वाचले आणि नंतर त्याला एका कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्याठिकाणी त्याने आधीच पोलिसांना बोलावून लपवलेले होते. विद्यार्थ्याचा खटला लढणा-या वकील फातमा सेरज यांनी ही माहिती दिली आहे. फातमा विचार आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याची मोहीम राबवणार्‍या एका संघटनेसाठीही काम करतात.