आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egyptians Await "India By The Nile" For Fresh Breeze

इजिप्तच्या नागरिकांना ‘इंडिया बाय द नाइल’चे वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात रविवारपासून सुरू होणारा ‘इंडिया बाय द नाइल’ महोत्सव इजिप्तमधील सामान्य नागरिकांसाठी जणू ताजा सुगंध होऊन भेटीला येणारा पाहुणाच ठरला आहे. म्हणूनच भारतीय कला-संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या या महोत्सवाची नागरिक आतुरतेने प्रतीक्षा करताना दिसून आले.

महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष. पहिल्या वर्षीचा अनुभव पाहता नागरिकांना यंदाही महोत्सव तितकाच रंगारंग होईल, असे वाटते. भारत आणि इजिप्त यांच्यातील घनिष्ठ संबंध इतिहास काळापासून आधुनिक काळातही दिसून येतात. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नसीर आणि नेहरू यांच्यापासून ही मैत्री कायम आहे. जानेवारीमध्ये झालेल्या क्रांतीनंतर लोकशाही आणि विकासाच्या क्षेत्रात इजिप्त भारताकडे मार्गदर्शक सहकारी या भावनेतून पाहते. दोन्ही देशांत अनेक घटक समान आहेत. उभय देशांच्या आकांक्षाही कमीअधिक स्वरूपात सारख्याच आहेत. त्या पार्श्वभूमीवर 30 मार्चपासून इजिप्तमध्ये हा सांस्कृतिक महोत्सव होऊ घातला आहे. त्यात बॉलीवूडचे कलाकारदेखील आपली कला सादर करणार आहेत. ‘बॉलीवूड लव्हस्टोअर ’ नावाचा सांगीतिक शो महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

शास्त्रीय नृत्य, साडीचे प्रदर्शन
भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या साड्यांचे प्रदर्शन महोत्सवातील महिलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्याशिवाय शास्त्रीय नृत्य कथ्थकचे सादरीकरण, भारतीय लोकसंगीताचाही आनंद रसिकांना घेता येणार आहे. अस्सल भारतीय पदार्थ भारतातील खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधीदेखील महोत्सवात सहभागी होणार्‍यांना मिळणार आहे. त्याचबरोबर भारतीय साहित्य, कविता आणि कार्टून्स यांनाही महोत्सवात स्थान देण्यात आले आहे.

पर्यटनाला प्रोत्साहन
पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी इजिप्तने हा उपक्रम सुरू केल्याचे मानले जाते. पर्यटनाच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठ मोठी आहे. राजधानी कैरो आणि अलेक्झांड्रियामध्ये महोत्सवातील बहुतेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.