आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होस्नी मुबारक सुटले, नजरकैदेत राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो- इजिप्तमधील क्रांतीनंतरचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची गुरुवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. मात्र, त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. न्यायालयाच्या सुटकेच्या आदेशानंतर पंतप्रधानांनी सहायक लष्करी कमांडर म्हणून त्यांच्या सुटकेचे व नजरकैदेचे आदेश जारी केले.

मुबारक विरोधकांकडून हिंसाचार घडवण्याची शक्यता पाहता सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजधानी कैरोला छावणीचे स्वरूप आले आहे. विविध शहरांमध्ये जवानांनी गस्त वाढवली आहे. लष्कर मुबारक यांना सुरुवातीस इंटरनॅशनल मेडिकल सेंटर आणि त्यानंतर अज्ञात ठिकाणी नेणार आहे. मुबारक यांनी इजिप्तवर 30 वर्षे सत्ता गाजवली.

इजिप्तमधील घटनाक्रम
इजिप्तमध्ये मुबारक यांना पायउतार करण्यापूर्वी जशी स्थिती होती, तशीच स्थिती आताही आहे. त्यांना हटवल्यानंतर लष्कराने निवडणुका घेतल्या, यामध्ये मुहंमद मुर्सी यांनी सरकार स्थापन केले. मुर्सी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे त्यांनाही 3 जुलै रोजी पदावरून हटवण्यात आले. यानंतर मुस्लिम ब्रदरहूड संघटनेने हिंसाचार व निदर्शने सुरू ठेवली आहेत. यादरम्यान चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

सुनावणीआधीच सर्वाधिक शिक्षा पूर्ण :
मुबारक यांची निदर्शकांच्या हत्येच्या आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांनी सुनावणी पूर्ण होण्याआधीच या गुन्ह्यातील जास्तीत जास्त होऊ शकणारी शिक्षा पूर्ण केली आहे. न्या. अहमद अल बहरावी म्हणाले, मुबारक यांच्या सुटकेचा आदेश अंतिम असून सरकारी पक्ष त्याविरोधात अपील दाखल करू शकत नाही.