आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eiffel Tower Nose: Chinese Youth Crazed By Eiffel Tower Nose Shape

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये आयफेल टॉवरसारखे नाक बनवण्याची क्रेझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉब प्रॉस्पेक्ट्स वाढवण्याच्या हेतूने चिनी विद्यार्थी सध्या अनोख्या प्रकारची शस्त्रक्रिया करून घेत आहेत. आयफेल टॉवरसारखे निमुळते आणि आकर्षक नाक बनवण्याची येथील युवकांत क्रेझ आली आहे.

वांग जुमिंग नामक सर्जनने ही शस्त्रक्रिया अस्तित्वात आणली आहे. या शस्त्रक्रियेत नाक मूळ जागेवरच वेगळ्या प्रकारे तयार केले जाते. कपाळाच्या ऊतींचा वापर करून नाक टोकदार व आकर्षक केले जाते. यासाठी 10 हजार डॉलरचा खर्च येतो, असे जुमिंग यांनी सांगितले. या शस्त्रक्रि येची चीनमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी सुरू असून अनेक शहरांत जागोजागी पोस्टर्स लागले आहेत. नाक टोकदार व आकर्षक असेल तर पाश्चिमात्य देशांत लवकर नोकरी मिळते, अशी चीनच्या लोकांची धारणा आहे. 2013 मध्ये चिनींना नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती. त्या वर्षी 70 लाख चिनी पदवीधर नोकरीचे दावेदार होते.