आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: ऑस्ट्रेलियात चाकू हल्ला; एकाच कुटुंबातील आठ मुलांची निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केन्स- ऑऑस्ट्रेलियातील केन्समध्ये सामूहिक हत्याकांडात एकाच कुटुंबातील आठ मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी घटना उघडकीस आली. घटनास्थळी एक महिला गंभीर अवस्थेत आढळून आली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ती या मुलांची आई असल्याची माहिती म‍िळाली आहे.
म‍िळालेल्या मा‍हितीनुसार, एका घरात आठ मुलांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी धाव घेतली असता एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवले. घरात आठ लहान मुलांचे मृतदेह आढळले. या सर्वांची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली होती. सर्व मुले 18 महिने ते 15 वर्षे वयोगटातील आहेत. जखमी महिलेचे वय 34 आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉट यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. देश सध्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत असल्याचे एबॉट यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सिडनीमधील एका कॅफेत दहशतवादी हल्ला झाला होता. एका दहशतवाद्याने 40 ओलिसांना वेठीस धरले होते. यात दहशतवाद्यासह तीन जण ठार झाले होते. त्यानंतर सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.