आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eighth Standard Shubham Starts Company, Most Discussed Young Industralist

आठवीत शिकणा-या शुभमने सुरू केली कंपनी, सिलिकॉन व्हॅलीतील युवा उद्योजक चर्चेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंटा क्लारा (अमेरिका) - सिलिकॉन व्हॅलीमध्ये उद्योगपती होण्यासाठी आता वयाचा कोणताही अडसर राहिला नाही. १३ वर्षांचा शुभम बॅनर्जी याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. आठवीत शिकणा-या शुभमने कॅलिफोर्नियामध्ये कंपनी स्थापन केली आहे. या माध्यमातून तो कमीत कमी किमतीतील ब्रेल प्रिंटर आणि दृष्टिहीनांसाठी स्पर्शाने लिहू शकणारे सॉफ्टवेअर तयार करतो.
बाजारात अशा पद्धतीच्या प्रिंटरची किंमत साधारण १.२३ लाख रुपये आहे.
आवाक्याबाहेरच्या या किमतीमुळे शुभमने गेल्या वर्षी शाळेतील विज्ञान प्रोजेक्टसाठी लेगो रोबोटिक किटयुक्त ब्रेल प्रिंटर तयार केले होते. त्याच्या या संशोधनाला अनेक पुरस्कारही मिळाले होते. अंध, दृष्टिहीन समुदायाकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर शुभमने स्वत:ची कंपनी ब्रेगो लॅब्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शुभमचे प्रिंटर पाहून इंटेलचे अधिकारीही प्रभावित झाले आणि त्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, किती निधी गुंतवला याबाबतची माहिती कळू शकली नाही. इंटेलची गुंतवणूक मिळवणारा शुभम सर्वात युवा उद्योजक असण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा शुभम बनवणार कमी किमतीचा ब्रेल प्रिंटर