आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोप संसदेची महानिवडणूक; चार दिवस चालणार प्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- युरोपियन संघटनेतील सदस्य राष्ट्रांचे भवितव्य ठरवणा-या संसदीय निवडणुकीला गुरुवारी सुरुवात झाली. चार दिवस चालणाºया प्रक्रियेत ब्रिटन, नेदरलँड यांनी सुरुवातीला आपला हक्क बजावला.

ही निवडणूक युरोपियन देशांसाठी महत्त्वाची असते. निवडणुकीनंतरच 751 सदस्यीय संसदेची सूत्रे कोणाकडे असतील, हे स्पष्ट होणार आहे. मतदान प्रक्रिया परिणाम युरोपियन राष्ट्रांतील सुमारे 50 कोटी नागरिकांचे भवितव्य ठरवणारी असेल. रविवारपर्यंत 28 सदस्य राष्ट्रे आपला हक्क बजावतील. पुढील वर्षी होणाºया ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनेदेखील ही महत्त्वाची परीक्षा ठरणार आहे. युरोपियन संसद ही युरोपियन देशांच्या संघटनेतील सदस्य राष्ट्राकडून निवडण्यात येणारे थेट मंडळ आहे. त्यात ब्रिटनच्या एकूण 73 जागा, तर नेदरलँडच्या 26 जागा आहेत. दरम्यान, शुक्रवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दुसºया क्रमांकाची संसद म्हणून युरोपियन संसदेची ओळख आहे. संसद सदस्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.

देश आणि जागा
जर्मनी- 96, फ्रान्स-74, इटली-73, ब्रिटन-73, स्पेन-54, पोलंड-51, रोमानिया-32, नेदरलँड-26, बेल्जियम-21, झेक रिपब्लिक-21, ग्रीक-21, हंगेरी-21, पोर्तुगाल-21, स्वीडन-20, ऑस्ट्रिया-18, बल्गेरिया-17, डेन्मार्क-13, स्लोव्हाकिया-13, फिनलंड-13.

कौन्सिल कसे काम करते ?
युरोपियन कौन्सिल हे युरोपियन देशांचे प्रतिनिधित्व करणारे मंडळ आहे. युरोपियन सदस्य राष्ट्रांतील कार्यकारी प्रतिनिधी कौन्सिलवर सदस्य म्हणून निवडले जातात. मंडळातील सदस्यांची बैठक वर्षातून चार वेळा होते. संघटनेतील देशांचा विकास व्हावा, या उद्देशाने हे मंडळ युरोपियन देशांसाठी धोरण ठरवण्याचे मुख्यत्वे काम करते. मंडळाकडे तशा स्वरूपाचे कोणतेही औपचारिक अधिकार नाहीत. मंडळाचे एकूण स्वरूप अनौपचारिक आहे.

युरोपियन कमिशनचे स्वरूप
युरोपियन संघटनेचे कार्यकारी मंडळ म्हणून युरोपियन कमिशनची ओळख आहे. विधेयक, विविध निर्णय, करार यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कमिशनकडे आहे. कमिशनचे 28 देश सदस्य आहेत. जोस मॅन्युएल डुराओ बारोसो विद्यमान अध्यक्ष आहेत. कौन्सिलकडून आयोगाच्या सदस्यांची निवड केली जाते.