आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 सप्टेंबर रोजी ऑ‍स्ट्रेलियात निवडणूक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कॅनबेरा - ऑ‍स्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान जुलिया गिलार्ड यांनी सार्वत्रिक निवडणूक 14 सप्टेंबर रोजी होईल, अशी घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवडणुकीची तारीख महिनाभर आधी जाहीर केली जाते. मात्र, गिलार्ड यांनी आठ महिने आधी घोषणा करून आधीचा पायंडा मोडीत काढला आहे. त्यांच्या घोषणेमुळे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गिलार्ड लेबर पार्टीच्या आहेत. निवडणुकीत त्यांना एक जागा कमी आली तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल. त्यांचे सरकार ग्रीन पार्टी व अपक्षांच्या टेकूवर तरले आहे. सध्या निवडणूक झाली असती तर लिबरल पार्टी सत्तेवर येण्याची जास्त शक्यता होती. ऑ‍स्ट्रेलियन कायद्यानुसार सरकारचा कालावधी तीन वर्षे असतो. पंतप्रधान निवडणुकीची घोषणा करतात.