आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Result Would Be Same On 1977, Narendra Modi Claimed

निवडणुकीचे निकाल 1977 सारखे असतील, नरेंद्र मोदींचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टँपा (फ्लोरिडा) - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल 1977 सारखे जनतेचा संताप व्यक्त करणारे असतील, असा दावा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारी नरेंद्र मोदी यांनी केला. देशाची पत घालवणार्‍या केंद्र सरकारचे दिवस भरले असल्याचेही ते म्हणाले.

‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या अमेरिकी संघटनेच्या संमेलनात समारोपप्रसंगी मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण केले. ते म्हणाले, ‘लोकशाही मार्गानेच हे सरकार पायउतार झाले पाहिजे याची तयारी आपण करावी. आता विकासाभिमुख भाजप सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.’

यूपीएने आपल्या कामगिरीवर श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान त्यांनी दिले. ही निवडणूक पदासाठी नसून गरिबांचे अर्शू पुसण्यासाठी आहे. भाषण संपताच यावर खल होईल. मात्र, काँग्रेसींना सांगू इच्छितो, डिसेंबर 2012 मध्येच मी चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे ते म्हणाले.