आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्लूटोच्या नव्या चंद्राचे नाव ठेवण्‍यासाठी मतदान सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


खगोलशास्त्रज्ञांना प्लूटोवर दोन छोटे चंद्र आढळून आले आहेत. या चंद्रांना नाव देण्यासाठी शास्त्रज्ञ आता सामान्य लोकांची मदत घेत आहेत. यासाठी लोकांना प्लूटोरॉक्स डॉट एसईटीआय डॉट ओआरजी या संकेतस्थळावर जाऊन मतदान करावे लागेल. परंपरेनुसार प्लूटोच्या चंद्रांची नावे हेड्स आणि अंडरवर्ल्डशी निगडित आहेत. कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यूमधील एसईटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्ल सागान सेंटरमध्ये काम करणारे ज्येष्ठ संशोधक मार्क शोवाल्टर आणि त्यांच्या टीमने या चंद्रांचा शोध लावला आहे.

मतदानाच्या निकालानुसार त्यांची नावे ठेवणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. सध्या तरी त्यांची नावे पी-4 आणि पी-5 अशी ठेवण्यात आली आहेत. प्लूटोच्या पूर्वी शोध लागलेल्या शॅरन, निक्स आणि हायड्रा या तीन चंद्रांप्रमाणेच नव्या दोन चंद्रांची नावेही ग्रीक किंवा रोमन पौराणिक कथांतील पात्रांवर आधारित असतील.वेबसाइटवर जाणारे व्हिजिटर लिखित स्वरूपात आपले प्रस्ताव देऊ शकतात. एक टीम या प्रस्तावांचे निरीक्षण करेल आणि त्यांची नोंद ठेवेल. 25 फेब्रुवारी 2013 पर्यंत मतदानाची मुदत आहे. चंद्रांची नावे निश्चित झाल्यानंतर इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनद्वारे यासंबंधीची घोषणा करण्यात येईल. 2011 मध्ये हबल टेलिस्कोपद्वारे मिळालेल्या छायाचित्रांवरून पी-4 या चंद्राचा शोध लागला होता, तर त्यानंतर एका वर्षाने पी-5 चा शोध लागला होता. या दोन्ही चंद्रांमध्ये सुमारे 20-30 किलोमीटरचे अंतर आहे. नासाचे न्यू होरायझन हे अंतराळ यान जुलै 2015 पर्यंत प्लूटोवर पोहोचणार आहे, त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ सध्या प्लूटोवर आणि त्याच्या उपग्रहांवर खूप बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

spaceref.com