आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये पर्यावरणस्नेही इलेक्ट्रीक विमान घेणार उड्डाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र सौजन्य - चायना डेली.
गुआंगडॉंग - चीनच्या बाजारपेठेत पर्यावरण स्नेही दोन सीट आरएक्स 1 ई विमानाची उत्सुकता वाढली आहे. चीन लवकरच देशातच विकसित करण्‍यात आलेले इलेक्ट्रीक विमानाचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन सुरु करणार आहे. विमानाच्या डिझाइनर्संना अशा आहे की हे विमान देशांतर्गत आणि विदेशातील मोठी बाजारपेठ काबीज कर‍ेल.
या वर्षाच्या शेवटी आरएक्स 1 ई विमानाला सिव्हिल एव्हिएशन अॅडमिनिस्‍ट्रेशन ऑफ चायना कडून प्रमाणापत्र मिळणार आहे. मात्र याचे उत्पादन 2015 पासून होणार आहे, असे यांग फेंगटियन यांनी सांगितले. ते चायनीज अॅकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंगमध्‍ये अध्‍यापनाचे काम करतात.