आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनमध्‍ये भाड्याने मिळणार इलेक्ट्रॉनिक स्कूटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील अनेक शहरांमध्ये सायकल भाड्याने देण्याची पद्धत आहे. मात्र, स्पेनमधील बार्सिलोना शहर या सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. तेथे इलेक्ट्रिक स्कूटर भाड्याने दिली जाते. गोइंग ग्रीन या प्रकल्पांतर्गत सुरू झालेल्या या योजनेला ‘मोटिट’असे नाव देण्यात आले आहे. प्रायोगिक स्तरावर 50 इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत. स्थानिक वापरासाठी तयार आलेल्या या स्कूटर ताशी 65 किलोमीटर वेगाने 40 ते 60 किलोमीटर धावू शकतात. स्कूटरमध्ये नेव्हिगेशनसाठी समोरील भागात एक ऑन बोर्ड स्क्रीन लावलेली आहे. 2014 च्या मध्यापर्यंत अशा 500 हून अधिक स्कूटर उतरवण्याची स्थानिक प्रशासनाची योजना आहे. ही स्कूटर एकदा भाड्याने घेता येते. तसेच महिनाभरासाठी पास तयार करूनही भाड्याने घेता येते. स्कूटर भाड्याने देण्यासाठी किमान वय 21 वर्षे तसेच त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे अनिवार्य आहे. कंपनीकडून सुरक्षित प्रवासासाठी हेलमेट तसेच विमा संरक्षणही देण्यात आले आहे. मात्र स्कूटरला नुकसान झाल्यास 4 हजार रुपयांपर्यंत भरपाई द्यावी लागणार आहे.
gizmag.com