आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी सोडली, जीवशास्त्र समजून घेतल्यानंतर अन सुईचा पर्याय शोधला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिझाबेथ होम्स - संस्थापक आणि सीईओ थेरानॉस
जन्म - फेब्रुवारी १९८४
शिक्षण - दुसऱ्या वर्षी केमिकल इंजिनिअरिंग सोडले
कुटुंब - वडील ख्रिश्चन होम्स चार सरकारी संस्थांसाठी काम करत आहेत. भाऊ िख्रश्चन होम्स पाच थेरानॉसमध्ये संचालक.
चर्चेत - तरुण सेल्फ मेड बिलेनियर (९ अब्ज डॉलर) आहे. त्या वेलनेस केअर लॅबमध्ये ७० प्रकारच्या चाचण्या रक्ताच्या काही थेंबांतून करतात.
एलिझाबेथ यांचे आई-वडील भले त्यांना निडर समजत होते, मात्र त्यांना लहानपणापासूनच सुईची भीती वाटत होती. मेडिकल टेस्ट होण्याआधी अनेक आठवडे त्याच्यापासून सुटका करून घेण्याची संधी शोधत असत. सुईची आवश्यकताच भासणार नाही, असे कोणते तंत्रज्ञान नाही काय, असे प्रश्न त्यांच्या मनात घोळत असत. त्याच वेळी वाहणारे रक्तही त्यांना पाहवत नव्हते. एके दिवशी त्यांची भीती घालवण्यासाठी मित्र शस्त्रक्रियेचा व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांना घेऊन गेले. रक्त पाहताच त्या बेशुद्ध झाल्या. शाळेतील संपूर्ण वर्षे याच भीतीतून घालवली. २००२ मध्ये त्यंानी स्टॅनफोर्ड विद्यापीठात केमिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेतला. मात्र, मनात अजूनही सुईच्या पर्यायावर विचार सुरू होता. इथे एक समस्या होती. जीवशास्त्राशी काही संबंध नव्हता. त्या वेळी त्यांना सिंगापूरच्या जिनोम इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथे रक्तातील सार्स विषाणू शोधण्याचे संशोधन सुरू होते. वर्षभर तिथे काढल्यानंतर त्यांना एक कल्पना सुचली. त्याच्या पेटंटचा मसुदा तयार करण्यासाठी काही दिवस लागले. या काळात रोज दोन तास झोपल्या. तो सादर करण्याआधी त्यांना स्टेनफोर्डला यावयाचे होते. कार चालवू शकत नव्हते त्यामुळे आईला सोबत आणले. प्रवासात झोप घेतली. तिथे पोहोचतातच त्या थेट प्रोफेसर रॉबर्ट््सनकडे गेल्या आणि म्हणाल्या, ‘चला, आता आपण व्यवसाय सुरू करू शकतो.’ वडिलांनी केलेल्या बचतीतून त्यांनी डायग्नोस्टिक कंपनी स्थापन केली. इथे रक्त काढण्यासाठी एका फिंगरस्टिकचा वापर केला जातो.