आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EMERGENCY LANDING - भारतीय प्रवाशांना आणण्यासाठी विशेष विमान पाकिस्तानला रवाना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/इस्लामाबाद - पाकिस्तानातील नवाबशाह विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आलेल्या विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी एअर इंडियाकडून पाठवण्यात आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर उतरले आहे. एयरबस ३१९ मधील प्रवाशांना पाकिस्तानच्या नवाबशाह विमानतळावरून भारतात परत आणण्यासाठी हे विशेष विमान पाठवण्यात आले होते.
विशेष विमानात एयर इंडियाचे आठ इंजिनियर देखील पाठवण्यात आले होते, जे खराब एयरबस ३१९ या विमानाची दुरूस्ती करणार होते. परंतु सुरुवातील सहयोग दाखविल्यानंतर पाकिस्तान परत आपल्या पूर्वपदावर आला. पाकिस्तानने सोमवारी भारतीय इंजिनिअर्सना एयर इंडियाच्या एयरबस ३१९ मध्ये चढू दिले नाही. भारताने पाठवलेले विशेष विमान नवाबशाह विमानतळावर उतरल्यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षारक्षकांनी विमानाला घेरले व भारतीय इंजिनिअर्सना विमानातच बसण्यास सांगितले.
एयरबस ३१९ मधील प्रवाशांना विशेष विमानात हलवण्यात आले. त्यानंतर विमानाने भारतात येण्यासाठी उड्डाण केले.
सुत्रांच्या माहितीनुसार, आबुधाबी ते दिल्ली प्रवास करणार्‍या एयर इंडिया विमानाच्या हायड्रोलिक यंत्रणेत बिघाड झाला होता. यानंतर वैमानिकाच्या विनंतीवरून नवाबशाह विमानतळावर इमर्जन्सी लॅडिंग करण्यास परवानगी देण्यार आली होती.
घडलेल्या घटनेबद्दलचा रिपोर्ट नागरी उड्डान मंत्रालयातर्फे सोमवारीच प्रंतप्रधान कार्यालयाला देण्यात येणार आहे.
एअर इंडिया-वैमानिकांत पुन्हा सुरू झाली धुसफूस
सरकारला जागा देण्यास एअर इंडियाचा नकार
एअर इंडियाच्या महाराजावर 454 कोटी सेवा कराचा बोजा