(अमेरिकाची युध्दनौका यूएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुश (सीवीएन-77))
इंटरनेशनल डेस्क - तंत्रज्ञानात झालेल्या विकासामुळे जगभरात अनेक आधूनिक पूल, इमारती निर्माण झाल्या आहेत. आज या गगनचुंबी इमारती जगातील कोणत्याही कोपर्यात पाहायला मिळतील. तंत्रज्ञानाचा विकास आणि अत्याधुनिक यंत्रांमुळे इमारीतंना एवढी उंची गाठणे शक्य झाले आहे. तसेच जहाज, अंडरवॉटर बिल्डिंग, पाणबुड्या, रॉकेट यांनाही अत्याधुनिकतेच्या शिखरावर पोहोचवणे शक्य झाले. आज 'वर्ल्ड इंजिनिअर डे' आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला जगभरातील अशा काही वास्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना आज त्यांच्या अद्भूत इंजिनिअरिंगसाठी ओळखले जाते.
युएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुश (सीवीएन-77), अमेरिका
युएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुशची निर्मिती 2001 मध्ये नॉर्थरोप ग्रूमॅन न्यूपोर्ट न्यूज शिपयार्डमध्ये सुरू झाली आणि 2009 हे जहाज पुर्ण झाले. या युध्दनौकेच्या निर्माणासाठी एकूण 377 कोटी रुपये लागले. तयार झाल्यानंतर ही युध्दनौका व्हर्जिनियाच्या नेव्ही स्टेशन नॉरफ्लॉकमध्ये आणण्यात आली. 1092 फुच विस्तारलेल्या आणि 1000,000 टन वजनाची ही जगातील सर्वात मोठ्या युध्दनौकांपैकी एक आहे. मात्र इतर युध्दनौकांच्या तंत्रज्ञानापेक्षा ही नौका एक पाऊल पुढे आहे. या युध्दनौकेत सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जे आतापर्यंत कोणत्याच वाहनामध्ये वापरण्यात आलेले नाही. ही जहाज दोन न्यूक्लिअर रिएक्टरने चालते. या जहाजेला 20 वर्षांपेक्षा जास्त काळ इंधन न भरता चालवता येऊ शकते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इंजिनि्अरिंगचे इतर 9 नमूने