आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England's 64 Years Old Grandmother With 285 Tattoos

हौसेला नाही मोल, 64 वर्षाच्या अजीने गोंदले 286 टॅटू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजी म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यासमोर साधेपणा असणारी एखादी वृद्ध महिला असे चित्र उभे राहते मात्र प्रत्येक वेळी आजी अशीच असण्याची गरज नाही. 13 वर्षांचे नातू असणारी 64 वर्षीय शैला जोन्सला पाहिल्यानंतर तर तुमचा हा समज साफ चुकीचा ठरेल. इंग्लडच्या सोमरसेट भागात राहणारी शैला आजच्या तरूण पिढीप्रमाणे केवळ मॉर्डनच नाही तर ती नवीन फॅशन फॉलो करण्यातही मागे नाही.
शैला फॉशनेबल कपडे घालते, तिला दागिन्यांचीही आवड आहे. एवढेच नाही तर तिने तिच्या शरीरावर 286 टॅटू गोंदून घेतले आहेत. एका शाळेत जाणा-या मुलीने टॅटू बनवल्याचे शैलाने पहिल्यांदा पहिले. तिला ते टॅटू आवडले आणि तिने टॅटू गोंदून घेण्याचे ठरवले.
शैला जेव्हा तिच्या दूस-या पतीला भेटली तेव्हा तिचा हा छंद पुन्हा एकदा जागा झाला. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला तिने दोन टॅटू गोंदवून घेण्यास सुरवात केली. आज शैलाचे अर्धे शरीर पूर्ण टॅटूनी भरलेले आहे. तिच्या शरीरावरील मिक जॅगर या रॉकस्टारचे नाव असणारा टॅटू तिचा सर्वात आवडता टॅटू आहे. तिचे टॅटू पाहिल्यानंतर लोक सकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचे शैला सांगते.
पुढील स्लाइडवर पाहा शैलाच्या टॅटूचे काही फोटो...