आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • English Practice Not Digest For Him; Wife Take Diverce

इंग्रजीचा सराव महागात पडला; पत्नीचा घटस्फोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बीजिंग - शीर्षक धक्कादायक आहे, परंतु चीनमधील एका पतीदेवाला इंग्रजीचा सराव खूपच महागात पडला. नवरोबाच्या आरडाओरडीमुळे पत्नीने इंग्रजीच्या या शिक्षकाशी काडीमोड घेतला. भाषेचा मोठ्याने उच्चार करून सराव करणे आणि शब्दांना स्मरणात ठेवण्याची पद्धत ली यांग यांनी शोधून काढली, परंतु त्यांचा हा सराव त्यांची पत्नी किम ली यांच्यासाठी डोकेदुखी ठरला होता.

रात्रंदिवस पतींचा हा सराव त्यांच्या मनस्तापाचे कारण ठरल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पत्नी किम यांच्या बाजूने निकाल दिला. सरावाच्या काळात यांग पत्नीला मारहाणदेखील करत. त्यामुळे त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचाही आरोप सिद्ध झाला आहे.