आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • English Should Predominate In Richmond Signs. Chinese Agree.

चीनमधून इंग्रजी हद्दपार,नेपाळमध्ये हिंदीचा आग्रह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग, काठमांडू - चीनमधील आघाडीच्या विद्यापीठांनी इंग्रजीला आपल्या कंपल्सरी विषयातून हद्दपार केले आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत या जागतिक भाषेला स्थान देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर हिंदी भाषेला नेपाळमध्ये दुसरी राष्ट्रीय भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे.

विज्ञान, अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी ओळखल्या जाणार्‍या नामांकित विद्यापीठाच्या परीक्षेत इंग्रजीला अनिवार्यता नाही. ही विद्यापीठे केवळ गणित आणि भौतिक परीक्षा घेऊ शकतात . कला शाखेच्या विद्यार्थ्यांना चिनी आणि गणित विषय निवडता येऊ शकतो. स्वतंत्र महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा ही राष्ट्रीय परीक्षेच्या तीन महिने अगोदर आयोजित करण्यात येते. हुशार मुलांना अधिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने चीनच्या शिक्षण विभागाने ही अनिवार्यता आणली आहे. देशातील 27 विद्यापीठांनी तीन भाषाविषयांचा समावेश करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, नेपाळने हिंदी भाषेला राष्ट्रीय दर्जा देताना दुसरे स्थान देऊन गौरव केला आहे. काठमांडूमध्ये शुक्रवारी 12 व्या नेपाळी राष्ट्रीय हिंदी परिषदेला सुरूवात झाली. त्यात ही मागणी करण्यात आली होती.