आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • English Speaking People Getting Huge Salary In Middle East

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आखातामध्ये इंग्लिश बोलणा-यांचा थाट! मिळतो गलेलठ्ठ पगार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- इंग्रजी ज्ञानभाषा आहे, असे म्हणतात. हीच ज्ञानभाषा मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत भल्यामोठ्या कमाईचे साधन बनली आहे. ज्या लोकांना इंग्रजी भाषा बोलता येते ते या प्रदेशात सहजपणे उत्पन्न मिळवू शकतात, असे दिसून आले आहे.
ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने करण्यात आलेल्या एका संशोधनपर पाहणीत ही माहिती समोर आली आहे. आठ देशांचा या अंतर्गत अभ्यास करण्यात आला. युरोमॉनिटर इंटरनॅशनलने प्रत्यक्षात ही पाहणी केली. एमईएनए या प्रदेशात फर्ड्या इंग्लिश येणा-या लोकांना चांगलीच मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोकरीमध्ये सामान्य कौशल्य असणा-या दोन कर्मचा-यांच्या पगारामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. इंग्लिश बोलू शकणा-या व्यक्तीला इतरांपेक्षा पाच टक्के अधिक पगार मिळतो. इजिप्तमध्ये हीच तफावत 75 टक्के एवढी आहे. बगदादमध्ये तर 200 टक्के अशी तफावत दिसून येते.
या प्रदेशात इंग्लिश येणाºयांसाठी असलेल्या संधीमध्ये आणखी वाढ होणार आहे. दरवर्षी पगाराचे प्रमाण 5 ते 7 टक्क्यांनी वाढेल, असे भाकीत या पाहणीनंतर व्यक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर 2016 पर्यंत ही वाढ होत राहील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. इंग्लिश उमेदवारांच्या मागणीमध्ये एवढी वाढ होण्यामागे उद्योग जगताची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण आयटी, सॉफ्टवेअर विकास करणाºया कंपन्यांकडून अशी मागणी वाढली आहे. हवाई उद्योग, दूरध्वनी, बँकिंग, अर्थ, पर्यटन या क्षेत्रात इंग्लिशचे सर्वाधिक महत्त्व निर्माण झाले आहे. रोजगार मिळवायचा असेल तर इंग्लिश येणे गरजेचे आहे. ही बाब या प्रदेशातील तरुणांच्या लक्षात आली आहे. मल्टिनॅशनल कंपन्यांसह परदेशातील नोकºयांसाठी या भाषेला पर्याय नसल्याने तरुण उमेदवार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते.