आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eric Betzig, Stefan Hell, William Moerner Win Nobel Prize In Chemistry, Divya Marathi

मायक्रोस्कोपला नॅनोस्कोप बनवणा-या शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : डावीकडून एरिक बेजिग, स्टीफन डब्ल्यू. आणि हेल विलियम ई. मॉर्नर)
स्टॉकहोम - मानवी डोळ्यांना सहजपणे न दिसणा-या सूक्ष्म पेशी पाहणे सहज शक्य करणा-या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यात अमेरिकेचे एरिक बेजिग, विल्यम ई. मॉर्नर व जर्मनीचे स्टीफन डब्ल्यू. हेल यांचा समावेश आहे. या तीन शास्त्रज्ञांनी मायक्रोस्कोपला नॅनोस्कोप बनवले. त्याद्वारे जिवंत पेशीचा प्रत्येक रेणू स्पष्टपणे पाहता येतो.
रॉयल स्विडिश अकॅडमी फॉर सायन्सने याची घोषणा करताना बुधवारी सांगण्यात आले की, अनेक वर्षांपासून साध्या मायक्रोस्कोपमध्ये एक अडचण होती. त्यात ०.२ मायक्रोमीटरपर्यंत छोटे रेणू पाहता येत असत; परंतु आता नव्या तंत्रामुळे त्याहीपेक्षा छोटेरेणूदेखील पाहता येऊ शकतात. या तंत्रज्ञानाचे नाव सुपर रिझॉल्व्ह फ्लोरोसेंस मायक्रोस्कोपी असे आहे. यात अल्झायमर, पार्किन्सससारख्या आजारांवरील उपचारांत यश येईल.

एरिक बेजिग (५४)
अमेरिकेत एचएच मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर.
विलियम ई. मॉर्नर (61)
अमेरिकेतील स्टेनफोर्ड विद्यापीठात प्रोफेसर.
स्टीफन डब्ल्यू. हेल (५४)
जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोफिजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसर.

संशोधन समजून घेऊया
२००० मध्ये स्टीफन हेल यांनी दोन लेझर किरणांचे भिंग अतिसूक्ष्म रेणू पाहण्यायोग्य बनविले. पहिल्या किरणापासून अणूंना चमकवले जात होते. दुस-या किरणाद्वारे चमक हटवून नॅनोमीटर आकारात दाखवत होते.सामान्य मायक्रोस्कोपमधून ०.०२ मायक्रोमीटरपेक्षा लहान रेणू डाव्या चित्रात अंधूक दिसतात. शास्त्रज्ञांना मायक्रोस्कोपमध्ये उजवीकडे ते स्पष्ट दिसते.

२००६ मध्ये बीजिंग आणि मॉर्नर यांनी सिंगल मॉलिक्यूल मायक्रोस्कोपी पद्धत शोधली. हा हेल यांच्या प्रयोगाची आधुनिक पद्धत होती. याबरोबर मायक्रोस्कोप नॅनोस्कोपमध्ये रूपांतरित झाले.