आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eroticism At The Tip Of A Pencil Or The Kama Sutra Dot To Dot

ब्रिटनमध्ये लहान मुलांच्या डॉट-टू-डॉट फॉर्ममध्ये प्रकाशित झाले भारतीय सेक्स गाइड \'कामसुत्र\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1600 वर्षांपू्र्वी कामजीवनावर लिहिल्या गेलेले कामसुत्र पु्न्हा एकदा चर्चेत आले आहे.वात्स्यायन लिखित कामसुत्र भारतासह आता जगभरात सेक्स गाईड म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रिटनमध्ये या प्रचीन पुस्तकावर आधारित स्केच बुक तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लहान मुले बिंदू जोडून ज्या पद्धतीने चित्र तयार करतात तशाच बिंदू पद्धतीचे 89 संभोग आसनाचे चित्र या पुस्तकात असणार आहे. पुस्तकाची विक्री 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पुढील महिन्यात ख्रिसमस असल्याने, भेट स्वरुपात देण्यासाठी पुस्तक एक महिना आधी प्रकाशित केले जात असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

या पुस्तकात पेन्सिलने बिंदूला बिंदू जोडून वेगवेगळ्या सेक्स पोजिशनची चित्रे तयार करता येणार आहेत. हे पुस्तक लहान मुलांच्या डॉट-टू-डॉट फॉरमॅटमध्ये असले तरी ते लहान मुलांसाठी नसून 18 वर्षांवरील व्यक्तीच खरेदी करु शकणार आहेत.
कामसुत्रचा इंग्रजी अनुवाद 1883 मध्ये व्हिक्टोरिअन संशोधक रिचर्ड बर्टन यांच्या मार्गदर्शनाखाली केला गेला होता.