आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपीय बँकांची स्थिती सुधारली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२००८ मध्ये आर्थिक संकटाने उध्वस्त झालेल्या युरोपीय बँकांची स्थिती सावरत आहे. १०० हून अधिक बँकांच्या परीक्षणातआढळले की, केवळ २४ सोडून इथर सर्व बँका गंभीर आर्थिक संकटाला तोंड देऊ शकतात. तज्ञांना आशा आहे की, युरोपबद्दल गुंतवणूकदारांना विश्वास निर्माण होण्यास मदत होईल.

धोक्याची घंटा – जगातील सर्वात जुनी बँक मोंटे डे पास्ची डी सिएनाचा इटलीच्या त्या बँकांमध्ये समावेश आहे जे कसोटीत उतरले नाही. युरोपीय बँकिंग प्राधिकरणाच्या परीक्षणात ग्रीस आणि सायप्रसच्या तीन तीन बँका उत्तीर्ण झालेल्या नाहीत.

उजळ संकेत – यूरोपच्या मोठ्या बँका परीक्षेत यशस्वी झाल्या आहेत. अपयशी २४ बँकांनी चाचणी सुरू झाल्यानंतर पैसे जमवणे सुरू केले. नंतर परीक्षण झाले असते तर फक्त १४ बँका अपयशी ठरल्या असत्या.

पुढे काय – हे मूल्यांकन अशा वेळी केले, जेव्हा युरोपीय सेंट्रल बँक ४ नोव्हेंबरला मोठ्या बँकांची जबाबदारी सांभाळत आहे.