आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अँपमुळे युरोपचे टॅक्सीचालक संपावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी कंपनीच्या ‘उबेर’या मोबाइल अँपमुळे युरोपातील टॅक्सीचालकांनी बुधवारी संप केला. लंडन, पॅरिस, माद्रिद, रोम, मिलान, बर्लिन या शहरांमधील टॅक्सी सेवा बंद झाल्याने नागरिकांची धावाधाव झाली. लंडनच्या रस्त्यावर तर टॅक्सींच्या रांगा लागल्या होत्या. एरवी वाहतुकीने गजबजलेला संसद चौक, ट्रॅफलगार चौक, व्हाइटहॉल रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. टॅक्सीचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवून आपला निषेध व्यक्त केला.
लंडन, पॅरिस, माद्रिद, बर्लिन, रोम, मिलान ठप्प
नेमकी समस्या काय ?
‘उबेर’ या मोबाइल अँपमुळे खासगी टॅक्सीचालकांची चंगळ झाली आहे. हे मोफत अँप असून कुणीही डाऊनलोड करू शकतो. ज्या टॅक्सीचालकांनी नोंद केली त्यांना आपोआपच व्यवसाय मिळतो आहे.त्यामुळे लंडन टॅक्सीचालक संघटनेचा अधिकृत परवाना असलेल्या ब्लॅक कॅब्सचालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. हीच परिस्थिती युरोपातील इतर शहरांमध्येही आहे.