आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपात अमेरिकेवरून वादंग, पर्यावरण विषयक निकषांचे पालन होणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - जर्मन वाहन निर्मात्यांची संघटना ट्रान्सलेटिंग ट्रेड इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिपने (टीटीआयपी) अमेरिका आणि युरोपीय समुदायाशी झालेल्या व्यावसायिक कराराचे स्वागत केले आहे. मात्र युरो झोनमधील डेन्मार्कसह इतर देशांनी यास विरोध केला आहे.विरोधकांच्या मते, टीटीआयपी सारख्या संघटनांमुळे ग्राहकांच्या हिताला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे.
तसेच पर्यावरण विषयक निकषांचे पालन होणार नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार घटण्याची शक्यता असून अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागेल, या करारामुळे देशातील वास्तविक सत्ता केंद्र राजकीय पक्षांच्या हातून अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्याच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील कंपन्या टीटीआयपीच्या माध्यमातून येथील नियमांतून सुटण्याचा मार्ग काढण्याची शक्यता आहे. या कराराचे कडवे समर्थक ब्रिटनचे पंतप्रधान जेम्स केमरॉन यांनी मात्र या माध्यमातून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत १० अब्ज पाैंडची भर पडण्याची खात्री असल्याचे म्हटले आहे.