इस्लामाबाद - युक्रेनमधील रशियाच्या हस्तक्षेपाचा निषेध करावा यासाठी युरोपियन संघटनेने पाकिस्तानवर दबाव वाढवला आहे. त्यानंतरच २८ सदस्यीय संघटनेविषयी तुम्हाला वाटत असणारा आदर स्पष्ट होईल, अशी इशारेवजा सूचना करण्यात आली आहे. राजदूत लार्स गुनर विजमार्क यांनी ही सूचना केली.
मेदवेदेव यांच्याशी चांगले संबंध-ओबामा : मेदवेदेव राष्ट्राध्यक्ष असताना रशियासोबत सर्वदृष्टीने चांगले संबंध होते; परंतु आता व्लादिमिर पुतीन अध्यक्ष आहेत; परंतु पूर्वीसारखे संबंध नाहीत, असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. उद्योगविषयक राउंडटेबल परिषदेत ओबामा गुरुवारी बोलत होते.