आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Europes Biggest Water Park Tropical Islands Resort

मन मोहून घेणारा युरोपमधील रोमांचक वॉटर पार्क, 8 फुटबॉल पिच एवढा आहे विस्तार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- ट्रॉपिकल आयलॅंड रिसॉर्ट)
बर्लिन- एअरक्राफ्ट हॅंगर सारख्या दिसणाऱ्या या ठिकाणी युरोपमधील सर्वांत मोठे वॉटर पार्क तयार करण्यात आले आहे. सुमारे 66,000 स्केअर मीटर परिसरावर हे वॉटर पार्क पसरले आहे. याची लांबी एवढी जास्त आहे, की स्टॅच्यू ऑफ लिबर्टीलाही याच्या आत फिट करता येऊ शकते.
एअरक्राफ्ट हॅंगरने घेतले वॉटर पार्कचे रुप
बर्लिन शहराजवळ असलेल्या क्रॉस्निकजवळ हे वॉटर पार्क आहे. मध्य युरोपातील सर्वांत मोठे पर्यटन स्थळ म्हणून हे प्रसिद्ध आहे. कधी काळी जेपेलिन विमानांचे येथे हॅंगर होते. परंतु, 1992 मध्ये याचा मालक दिवाळखोर झाला. त्यानंतर याची स्थिती खराब झाली. सुमारे 10 वर्षांपूर्वी एका मलेशियन कंपनीने याचा चेहरा मोहरा बदलला.
काय काय आहे खास
1- तब्बल 8 फुटबॉल पिच येतील एवढ्या मोठ्या जागेवर हे वॉटर पार्क आहे. सुंदर तलाव आणि जंगलेही येथे बघायला मिळतात. बिचही तयार करण्यात आले आहे.

2- जर्मनीतील सर्वांत उंच वॉटर स्लायडर टॉवरही यात आहे. येथील तापमान नेहमीच 26 डिग्री सेल्सियसच्या जवळपास राहते. येथील आल्हाददायक हवामान पर्यटकांना नेहमी आकर्षित करते.

3- रिसॉर्टमधील वर्षावन सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यात सुमारे 50,000 वृक्ष आणि वनस्पती आहेत. सुमारे 600 प्रकारचे वृक्ष येथे दिसून येतात.

4- बार, स्पा, सॉन, तलाव आणि गुफा या पार्कमध्ये आहेत. एकावेळी 6,000 पर्यंटक येथे पर्यटनाचा आनंद लुटू शकतात. राहण्यासाठी 522 खोल्यांची सोय असून टेंट हाऊसही उभारण्यात आले आहेत.
5- भारतातील प्रसिद्ध एलिफंटा टेंपल आणि कंम्बोडियाच्या अंकोर वॉट टेंपलची प्रतिकृती येथे आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या अवाढव्य वॉटर पार्कच्या आतील नजारे... मन मोहून घेणारे बिचेस... वर्षावने आणि बरेच काही...