आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everest Was Born After India Collided With Asia: Report

भारत-आशिया खंडाच्या टकरीतून एव्हरेस्टचा जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताची आशियासोबत झालेली टक्कर आणि त्यातून घडून आलेल्या भौगोलिक मंथनाचा परिपाक म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टचा (हिमालय) जन्म झाला असावा, असे संशोधकांना वाटते.

भौगोलिक मंथनाच्या प्रक्रियेत भारताचा भूभाग आशिया खंडावर येऊन धडकला. त्या वेळी हिमालयीन पर्वतराजी तयार झाली असावी. ही प्रक्रिया भौगोलिक पातळीवर अनपेक्षित होती. जगातील सर्वोच्च 100 शिखरांमध्ये एव्हरेस्ट अव्वलस्थानी आहे. भारताची युरेशियाला कशी टक्कर झाली, याचा अभ्यास मेलबर्न विद्यापीठातील लुईस मोरेसी यांच्या टीमने केला आहे. टीमने भौगोलिक मंथनाला स्पष्ट करण्यासाठी एक संगणकीय प्रतिमान तयार केले आहे. त्याद्वारे मोरेसी यांनी आपला दावा मांडला. टक्कर आणि त्यातून झालेली क्रिया पिळलेल्या टूथपेस्टमधून पेस्ट निघावी तशी झाली असेल, असे वर्णन संशोधकांनी केले आहे.