आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Every 40 Seconds A Person Commits Suicide Says A Report Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2012 मध्ये भारतात दररोज झाल्या 707 आत्महत्या, डब्ल्यूएचओचा अहवाल सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - प्रतिकात्मक)

जिनिव्हा - जगात सर्वाधिक आत्महत्या करणारे लोक भारतात आहे. येथे आत्महत्येचे प्रमाण दररोज 707 पर्यंत पोहोतले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या दक्षिण पश्चिम आशिया क्षेत्रातील 2012 ची आकडेवारी असणा-या अहवालात हा खुलासा झाला आहे.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जगात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. या रिपोर्टनुसार तरुण आणि ज्येष्ठांमध्ये आत्महत्या करण्याच्या प्रमाणात सर्वाधिक वाढ झाली आहे. आत्महत्या करणा-यांमध्ये दक्षिण पश्चिम आशिया मध्ये निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांचे प्रमाण सुमारे 39 टक्के आहे.

आकडेवारीनुसार भारतात 2012 मध्ये 2,58,075 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या खूप जास्त होती. आत्महत्या करणा-यांमध्ये 1,58,098 पुरुष तर 99,977 महिला आहेत. भारताल एक लाख नागरिकांमागे आत्महत्या करणा-यांचे प्रमाण 21.1 टक्के आहे.