आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ex Lover Of Kim Jong Un Shot Dead In North Korea

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉर्नोग्राफी कायदा मोडलाः उत्तर कोरिया हुकुमशाहाच्‍या माजी प्रेयसीला घातल्‍या गोळ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांच्‍या पूर्व प्रेयसीला जाहीरपणे गोळ्या घालून मृत्‍यूदंडाची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे. ह्योन सोंग वोल ही गायिका होती. तिच्‍यासोबत इतर 11 ऑर्केस्‍ट्रा कलाकारांनाही गोळ्या घालून ठार मारण्‍यात आले आहे. या सर्वांवर पॉर्नोग्राफीच्‍या कायद्याचे उल्‍लंघन केल्‍याचा आरोप होता. केवळ 12 दिवसांमध्‍ये त्‍यांना दोषी ठरवून मृत्‍यूदंडाच्‍या शिक्षेची अंमलबजावणीही करण्‍यात आली.

उत्तर कोरियाच्‍या सरकारी वृत्तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार, ह्योन हिला उनहांसू ऑर्केस्‍ट्रा, वांगजासेन लाईट बँड आणि मोरानगोंग बँडच्‍या 11 सदस्‍यांसोबत 17 ऑगस्‍टला पॉर्नोग्राफीच्‍या घरगुती हिंसेच्‍या नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी अटक करण्‍यात आली होती. उनहांसू हा उत्तर कोरियाचा सर्वाधिक लोकप्रिय पॉप ग्रूप असून या सर्वांना एका रांगेत उभे करुन 12 स्‍टेनगनधारी लोकांनी गोळ्या घालून ठार केले. एवढेच नव्‍हे तर त्‍यांच्‍या कुटुंबियांनाही हा भीषण क्षण पाहण्‍यासाठी तिथे हजर करण्‍यात आले होते.