धरणीवर पशू-पक्ष्यांचे वेगवेगळे महत्त्व आहे. मानव सभ्यतेच्या विकासात पशू-पक्षी एक महत्त्वपूर्ण कडी आहे. परंतु, जगभरात विकासाच्या चढाओढीत ही कडी कुठेतरी खंडीत होत असताना दिसून येत आहे. यामुळे जनावरांच्या अस्तित्वाचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे होऊन बसले आहे. हाच उद्देश समोर ठेऊन इटलीत 4 ऑक्टोबर 1931 रोजी World Animal Day सुरू करण्यात आला.
World Animal Day साठी 4 ऑक्टोबर ही तारीख निवडण्यामागेही एक उद्देश आहे. या दिवशी जनावरांचे संरक्षक आणि सेंट फ्रांसिस यांच्या स्मृती ताज्या केल्या जातात. यामुळे जनावरांचे संरक्षण करण्याच्या दिशेने जागरुकता पसरवण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो.
पुढील स्लाईडवर बघा, श्वास रोखून बघावे असे निवडक फोटो.... हरखून जा वाइल्ड लाइफमध्ये...