कोबानी- सीरियाच्या सीमेवरील कोबानी शहरासह आजुबाजुच्या परिसर कुर्दीश सैन्याने
आपल्या ताव्यात घेतला आहे. कुर्दिश सैन्याने 20 जिहादींचा खात्मा केला असून एकाला जिवंत पकडले आहे. कुर्दिश सैन्य आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता. 26 जानेवारीला कोबानीवर कुर्दीश सैन्याने ताबा मिळवल्यानंतर छायाचित्रे समोर आली होती.
कोबानी शहराजवळ असलेल्या मनाजमध्ये पीपल्स प्रोटेक्शन युनिटच्या कुर्दिश जवानांनी ISIS च्या 19 दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती 'सीरियन ऑब्जर्व्हेट्री ऑफ ह्यूमन राइट्स'चे संचालक रामी अब्देल रहमान यांनी दिली. याशिवाय तीन जिहादींना पूर्वी भागात ठार मारण्यात आले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. कुर्दीश सैन्याने कोबानी शहरासह पाच गावांची ISIS च्या तावडीतून सूटका केली आहे. या भागातील शेकडो गावे अजूनही ISIS च्या ताब्यात आहेत.
इस्लामिक स्टेटने जवळपास 350 गावांवर कब्जा केला आहे. कोबानीमधील हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. सध्या ते तुर्कीमधील शरणार्थी शिबिरात आश्रय घ्यावा लागला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कुर्दीश सैन्याने ताब्यात घेतल्यानंतरचे कोबानी शहर