आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Expendable Three Hollywood Movie News In Marathi

इंटरनेट पायरसी: ‘एक्स्पेंडेबल्स-थ्री’ प्रदर्शनापूर्वीच डाऊनलोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- हॉलीवूड अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलॉन,अर्नोल्ड श्वार्त्झनेगरसारख्या सुपरस्टारचा बहुप्रतीक्षित ‘एक्स्पेंडेबल्स-थ्री’ प्रदर्शित होण्याअगोदरच व्हायरल झाल्याने लाखोंनी तो पाहिला. हे प्रकरण निर्माता कंपनीने गांभीर्याने घेतले असून व्हायरल करणार्‍या सर्व संकेतस्थळांना कोर्टात खेचले आहे. प्रदर्शनापूर्वीच सुमारे दोन लाख लोकांनी हा चित्रपट इंटरनेटवरून डाऊनलोड केला.80च्या दशकातील व्हिडीओ पायरसी पेक्षाही इंटरनेट पायरसी अतिधोकादायक ठरण्याची ही चिन्हे आहेत.त्यामुळेच हॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

एक्स्पेंडेबल्स-थ्री ची निर्मिती लायन्स गेट कंपनीने केली आहे. 25 जुलै रोजी चित्रपट मोठय़ा प्रमाणात डाऊनलोड झाला. चित्रपटाला परवानगीशिवाय प्रदर्शित केल्याबद्दल कॉपीराइट कायद्यांतर्गत कंपनीने सर्व संकेतस्थळांच्या विरोधात कॉपीराइट उल्लंघनाची याचिका दाखल केली आहे. कॅलिफोर्नियातील कोर्टात गेल्या गुरुवारी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अशा प्रकारे प्रदर्शनापूर्वीच चित्रपट व्हायरल झाल्याने नुकसान झाल्याचा दावा कंपनीने याचिकेत केला आहे. हा चित्रपट मल्टिस्टारर आहे. स्टेलॉन, जेसन स्टॅथम, अर्नोल्ड श्वार्त्झनेगर, विस्ली स्निप्स या अँक्शन स्टारसह केल्सी ग्रॅमर, हॅरिसन फोर्ड, केलन रुझ या कलाकारांचा समावेश आहे.

प्रीमियर 15 ऑगस्टला
‘एक्स्पेंडेबल्स-थ्री चित्रपटाचे प्रदर्शन नियोजित वेळापत्रकानुसार 15 ऑगस्ट रोजी होणार आहे; परंतु त्या अगोदरच हा चित्रपट नेटिझन्सच्या पुढय़ात झळ कल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

‘डोमेन नेम’वर कारवाई
लायन्स गेटने खटला दाखल केला त्याच दिवशी अमेरिकेच्या गृहखात्याकडून कारवाईला सुरुवात झाली होती. अनेक वेबसाइटचे डोमेन नेम जप्त करण्यात आले.

>24 तासांत 1,89,000 युजर्सनी डाऊनलोड केला