आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Expert Predicts Males Will Be Extinct In Five Million Years

जगभरातील पुरुष होत आहेत \'कमजोर\'; पृथ्वीवरुन नष्ट होणार पुरुष जमात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- जगभरातील पुरुषांचे दिवस आता भरत आल्याचे एका संशोधनात पुढे आले आहे. ऑस्‍ट्रेलि‍यातील एका महिला वैज्ञानि‍काने दावा केला आहे की, पुरुषांची प्रजात जास्त दिवस या जगात टिकणार नाही. येत्या 50 लाख वर्षांत पुरुष प्रजात पृथ्‍वीवरुन नष्ट होईल. या महि‍ला वैज्ञानि‍काने हा ही दावा हकेला आहे की, पुरुष प्रजात नष्ट होण्याला सुरुवात झाली आहे.

क्रोमोझोम्‍सच्या आधारावर संबंधित महिलेने संशोधन केल्यानंतर हा दावा केला आहे. तिचे म्हणणे आहे की, महि‍लांतील क्रोमोझोम्‍स पुरुषांच्या तुलनेत अधिक व मजबूत आहेत. त्यामुळे यापुढे महिलांची संख्या वाढेल व पुरुषांची संख्या घटत जाईल व हळू-हळू ती नष्ट होईल. प्रा. जेनी ग्रेव्‍स ऑस्‍ट्रेलि‍यातील नामांकित महि‍ला शास्त्रज्ञ आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सगळ्यात शेवटी जिवंत राहण्याची शर्यत एक महिलाच जिंकेल. पुरुष या शर्यतीतून मागे पडेल.

प्रा. जेनीचे म्हणणे आहे की, पुरुष प्रजाती नष्ट होण्यास प्रारंभ झाला आहे. पुरुष प्रजाती नष्ट होण्यास कारणीभूत Y हा क्रोमोझोम असणार आहे. पुरुषांच्या शरीरातून Y क्रोमोझोमचे प्रमाण दिवसेंदिवस कमालीचे घटत चालले आहे. जेनी यांनी हे संशोधन करताना अनेक पुरुष व महि‍लांच्या क्रोमोझोमचा अभ्यास करुन निष्कर्ष काढले आहेत.

प्रा. जेनीच्या संशोधनातील आणखी धक्कादायक निष्कर्ष वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....