आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Expired Meat Scandal And Food Factories Of China, Divya Marathi

CHINA मध्‍ये एक्सपायरी मांस घोटाळा, खराब मांस विकले जायचे मॅक्डोनाल्डमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाई - चीनमध्‍ये सध्‍या मॅक्डोनाल्ड, केएफसी आणि पिझ्झा हटच्या खाद्यपदार्थांमध्‍ये खराब मांस वापरल्याचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी चीनच्या पोलिसांनी अमेरिकन फूड सप्लायर ओएसआई कंपनीच्या पाच कर्मचा-यांना अटक केली आहे. खराब मांस विकल्याप्रकरणी कंपनी दोषी आढळली आहे. फॅक्टरीतून 160 टन कच्चा माल आणि 1 हजार 100 टन तयार माल जप्त करण्यात आला आहे.
बेकायदेशीर कार्यात हुसी फूड कॉर्पोरेशन सहभागी असल्याचे न‍िदर्शनास आले आहे. या कॉर्पोरेशनची मालकी ओएसआय ग्रुपकडे आहे, अशी माहिती चीनच्या खाद्य आणि सुरक्षा संस्थेने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. देशातील इतर खाद्यपदार्थ फॅक्टरींचीही चीनच्या खाद्यपदार्थ सुरक्षा संस्था चौकशी करत आहे.

एक्सपायरी मीट स्कॅडल
हुसी फूड फॅक्टरीमध्‍ये एक्सपायरी आणि खराब मांस नव्या एक्सपायरी डेटने पुन्हा पॅक करण्‍यात येत होते. बरोबरच खराब मांस हे ताज्या स्‍टॉकमध्‍ये एकत्र केले जात होते. या फॅक्टरीमधून मॅक्डोनाल्ड, केएफसी, रेस्तरॉं ऑपरेटर यमृस पिझ्झा हट, स्‍टारबक्स, बर्जर किंग, पापा जॉन्स पिझ्झा आणि 7 इलेव्हन आदी खाद्यपदार्थ ब्रँड मांस घेत होते. याचा भांडाफोड चीनच्या टीव्ही चॅनलने केला होता.

पुढील स्लाइड्समध्‍ये पाहा हुसी फॅक्टरीसह चीनच्या अन्न पदार्थांची छायाचित्रे...