आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exploding Toilet Leaves Brooklyn Man Afraid To Flush

शौचालयाचा स्फोट, एक जण गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेत शौचालयाचा स्फोट होऊन एक 58 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना उजेडात आली आहे. सदर व्यक्तीच्या चेहर्‍याला जखमा झाल्या आहेत.
मायकेल पियर असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. शौचालयातील भांड्याचे तुकडे झाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर त्याचे तुकडे घुसले होते. त्याचबरोबर हातापायांनाही जखमा झाल्या आहेत. एकोणिसाव्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये ते राहतात. फ्लॅशच्या शौचालयातील भांड्यातील वायू खूप खोलवर असला तरी ‘चिनीमातीच्या भांड्याचा बाँब’ने पियर यांच्यावर 30 टाके पाडून घ्यायची वेळ आली आहे. घटनेनंतर पियर धास्तावले असून पाण्याच्या वापरासाठी ते आता सुरक्षित अंतर ठेवू लागले आहेत. फ्लश व्हॉल्व्ह चांगला चालावा, यासाठी त्यांनी प्लंबरकडून सर्व गोष्टींची खातरजमा करून घेतली आहे. दरम्यान, पियर यांनी इमारत व्यवस्थापनाच्याविरुद्ध नुकसान भरपाईचा दावादेखील ठोकण्याची तयारी केली आहे.