आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Explosion In Lebenon Capital , Former Finance Minister With Other Died

लेबनॉनच्या राजधानीत स्फोट; माजी अर्थमंत्र्यांसह सहा ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत - लेबनॉनच्या राजधानीत शुक्रवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात माजी अर्थमंत्री मोहंमद शतह (62) यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला. घटनेत 70 नागरिक जखमी झाले. माजी पंतप्रधान साद हरीरी यांचे निकटवर्तीय म्हणून शतह ओळखले जात होते. स्फोटाच्या काही वेळापूर्वी शतह यांनी हिज्बुलच्या विरोधात ट्विट केले होते.
बैरूतमध्ये आयोजित एका बैठकीत हजेरी लावण्यासाठी शतह जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. ते लेबनॉनमधील हिज्बुल संघटनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात. अद्याप स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. परंतु हरीरी यांनी मात्र स्फोटामागे हिज्बुलचा हात असल्याचा आरोप केला आहे. शतह देशातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ होते. ते माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांचे निकटवर्तीय होते. रफिक यांचीही 2005 मधील एक बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शतह रफिक यांचे पुत्र साद हरीरी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री बनले होते. सरकारी वकील समीर हमूद यांच्या म्हणण्यानुसार हल्ल्यात 50 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला.