आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, 12 साखळी स्फोटांत 31 ठार, 90 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजींग - चीनच्या शिनजियांग प्रांतात गुरुवारी एकापाठोपाठ एक झालेल्या 12 बॉम्बस्फोटाने परिसर हादरून गेला. या स्फोटात 31 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तर 90 हून अधिक लोक जखमी आहेत. दहशतवाद्यांनी उरूमकी शहतात स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता हे स्फोट घडवले. घटनास्थळी मोठ्या प्रमणावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
दोन कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी बाजारामध्ये गर्दीच्या ठिकाणी स्फोटक साहित्य फेकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याचे म्हटले असले तरी नेमका आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार या हल्ल्यात 31 जण ठार झाले आहेत.

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सुमारे डझनभर हल्ले केले. या दरम्यान परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण जागा मिळेल त्या ठिकाणी पळत सुटले होते.
पुढील स्लाईडस्वर पहा स्फोटाचे फोटो...