आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; सलग झालेल्या स्फोटात 31 ठार, 90 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या श‍िनजियांग प्रांतात गुरूवारी (ता. 22) लगोपाठ झालेल्या 12 बॉम्बस्फोटाने हादरून टाकले. या सलग झालेल्या बॉम्ब स्फोटात 31 ठार, तर 90 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी स्फोट सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी उरूमकी शहरात घडव‍िला.घटनास्थळी कडक पोलिस व्यवस्था तैनात करण्‍यात आली आहे.

आतंकवादी हल्ल्यात अनेक जण मरण्‍याची, जखमींच्या संख्येबाबत निश्चित आकडा कळू शकलेला नाही. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार 31 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनी सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार कारमध्‍ये बसलेल्या दहशतवाद्यांनी उरूमकी शहराच्या खुल्या बाजारात अनेक विस्फोटक सामग्री फेकून हल्ला घडवल्याचे सांगितले आहे. हल्ल्याच्या वेळी बाजारात खूप गर्दी होती.

दहशतवाद्याने जवळवजळ डझनभर स्फोट घडवले. या दरम्यान बाजारात धावपळ उडाली होती. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे लपण्‍यास गेला, असे एका प्रत्यक्षदर्शींने सांगितले.