वॉशिंग्टन - नशिबात असल्यास एखाद्या वाईटात वाईट वस्तूबाबत किती चांगले होऊ शकते, याचे नेमके उदाहरण अमरिकेत दिसून आले आहे. ईटी अर्थात एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल हा गेम, व्हिडिओ गेम क्षेत्रातील सर्वात वाईट गेम म्हणून ओळखला जातो. १९८२ मध्ये तयार करण्यात आलेला हा गेम एका चित्रपटावर आधारित असून कुणीही विकत घेत नसल्यामुळे अटारी गेम्स या कंपनीने त्याच्या लाखो कॉपी अक्षरश: कचऱ्याच्या ग्राउंडवर खड्ड्यात पुरल्या. या वर्षी एप्रिल महिन्यात ईटी गेमच्या १३०० कॉपीज मेक्सिको येथील मैदानात पुरण्यात आल्या होत्या.
फीनिक्सप्रमाणे आकाशात झेप
या जुन्या गेमच्या १३०० पैकी निम्म्याहून अधिक कॉपीजचा लिलाव केला जाणार आहे. कचऱ्याच्या मैदानावरील सुपरवायझर जो लेवांडोवस्की यांच्या मते, कचऱ्यात टाकलेल्या या गेमचा लिलाव म्हणजे फीनिक्स पक्ष्याची झेपच आहे. हे गेम्स सापडल्यावर आम्हाला व्हिडिओ गेम्स क्षेत्राची सुरुवात, अंत आणि पुन्हा नव्याने सुरुवात झाल्याचा अनुभव आला. आता या गेमच्या कॉपीज अलामोगोर्दो शहरातील मेक्सिको म्युझियम ऑफ स्पेस हिस्ट्री येथे ठेवल्या आहेत. शहर प्रशासनातर्फे यापैकी काही कॉपींचे जतन केले जाणार आहे.