आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएनएवरून चेह-याची थ्रीडी प्रिंट करण्‍याचे तंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण कुठेही गेलो तरी आपले जनुकीय पुरावे म्हणजेच आनुवंशिक ओळख तेथे ठेवून येतो. मग तो एखादा केस असेल किंवा ग्लासमध्ये राहिलेली लाळ असेल. न्यूयॉर्कमधील हेथर डेव्ही-हँग्बोर्ग ही कलाकार केस, लाळ, सिगारेटचे थोटूक इत्यादींपासून डीएनए काढून त्यापासून संबंधित व्यक्तीच्या चेह-याची त्रिमितीय प्रिंट घेते. या प्रकल्पाला तिने ‘स्ट्रेंजर व्हिजन’ असे नाव दिले आहे. एका केसाचे निरीक्षण करताना तंत्रज्ञानासह नवा विचार मांडून त्याद्वारे ही किमया साधण्याची कल्पना तिला सुचली. हा विचार मनात आल्यानंतर हेथरने, लोकांनी सोडलेल्या अवशेषांवरून काय काय माहिती मिळू शकते यावर संशोधन केले. निष्कर्ष धक्कादायक होते. आता ती छोट्याशा अवशेषावरून चेह-याची प्रतिकृती तयार करते. डीएनएमध्ये वयाचा अंदाज लावला जात नाही त्यामुळे तिने तयार केलेले सर्व चेहरे 30 वर्षे वयाच्या आसपास दिसतात. या कलेची संपूर्ण पद्धत हॅथरने तिच्या ब्लॉगवर सविस्तर लिहिली आहे.
cnn.com