आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक बंद; वडील देणार मुलीस 200 डॉलर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - मुलीने फेसबुक अकाउंट बंद केल्यास तिला 200 डॉलर देण्याचा करार एका अमेरिकी पित्याने केला आहे. मुलीचे नाव रॅशेल बाएर आहे. वडील पॉल बाएर बोस्टन येथील ऊर्जा कंपनीत ग्रूम एनर्जी सोल्यूशनचे उपाध्यक्ष आहेत. रॅशेललाच कराराची कल्पना सुचली. फेसबूकमुळे वेळ खूप वाया जातो व लक्षही विचलीत होते. मात्र, त्याचबरोबर तिची पैसे कमावण्याची इच्छा होती त्यानुसार हा करार केला, असे पॉल म्हणाले. रॅशेलला एप्रिल महिन्यापर्यंत 50 डॉलर मिळणार असून उर्वरित रक्कम जूनपर्यंत मिळणार आहे. रॅशेल सहा महिन्यानंतर पुन्हा फेसबूक वापरू शकते, असे त्यांनी सांगितले.