आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या तरुणांसाठी फेसबुक अनाकर्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारत आणि आशियातील तरुणांसाठी फेसबुकची क्रेझ असली तरी ब्रिटनमधील तरुणांना त्याचे काहीही आकर्षण राहिलेले नाही. त्यांच्या दृष्टीने ही सोशल नेटवर्किंग साइट ‘मृत ’ बनली आहे. त्यांना आता कूल पर्याय हवा आहे !
लंडन विद्यापीठातील प्रोफेसर डॅनिएल मिलर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने हा अभ्यास केला आहे. विविध देशांत करण्यात आलेल्या अभ्यासात 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची मते जाणून घेण्यात आली. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांनाही फेसबुकमध्ये कसलाही रस नाही. त्यांनी इतर माध्यमांचा संवादासाठी वापर करण्यास प्राधान्य दिल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. प्रौढ मंडळी फेसबुकचा वापर करतात. पहिल्या पिढीने वापरलेल्या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करण्यास तरुण मुलांनी टाळल्याचे दिसून येते. तरुणांसोेबतच लहान मुलांनीही त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसते. त्यामुळे फेसबुकचा वापर लवकरच कालबाह्य होईल, असे चित्र दिसते. तरुण मुले कूलर पर्यायाचा शोध घेऊ लागले आहेत.
बरोबरी नाही
ब्रिटनमध्ये फेसबुकचा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. मात्र या तोडीची इतर कोणतीही सोशल नेटवर्किंग साइट अद्याप तरी इंटरनेटवर उपलब्ध नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. युजर्स इतर अनेक सोशल नेटवर्किंगचा वापर करत असले तरी फेसबुकची बरोबरी करणारी वेबसाइट सध्या तरी अस्तित्वात नाही.
इतर देशांतही हे घडेल
फेसबुक अगदीच नामशेष होणार नाही, परंतु ब्रिटनमधील तरुणांच्या दृष्टीने फेसबुक संपल्यात जमा आहे. त्यामुळे इतर देशांतील तरुण मुलेही त्याचे अनुकरण करतील, अशी शक्यता वाटते.
डॅनिएल मिलर, प्रोफेसर, लंडन विद्यापीठ