आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK सीईओ मार्क झुकेरबर्ग आज देणार चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे LIVE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेसबूकबाबत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एका प्रकारचे औत्सुक्य आहे. हे मायाजाळ उभे करणारे फेसबूकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याबाबतही तसाच काहीसा प्रकार त्यांच्या चाहत्यांमध्ये दिसून येतो. पण चाहत्यांच्या मनात जे प्रश्न आहेत, त्यापैकी काहींना आज त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे मार्क झुकेरबर्ग स्वतः चाहत्यांच्या प्रश्नांना फेसबूकवर लाईव्ह उत्तरे देणार आहे.
एका लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे मार्क चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. Q&A with Mark या सेशनमध्ये सहभागी होत फेसबूक यूजर्सनी वोट केलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतील. मार्कने स्वतः त्याच्या फेसबूक वॉलवर यासंदर्भात माहिती दिली आहे. फेसबूकमध्ये दर शुक्रवारी कंपनीच्या सर्व कर्मचा-यांचे अशा प्रकारेचे Question-Answer सेशन घेण्याची परंपरा आहे. त्यात कर्मचारी कोणताही प्रश्न विचारू शकतात. फेसबूकच्या कल्चरचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. लोक मला नेहमी कंपनी पुडे नेण्यासंदर्भातील किंवा काही खास बाबींवर माझे मत मागत असतात. मीही यातून बरेच काही शिकलो आहे, असे मार्कने आपल्या फेसबूक वॉलवर पोस्ट केले आहे.

कंपनी एकाच मार्गाने का जात आहे आणि जगात जे काही घडत आहे त्याबाबत त्यांचे मत काय आणि आपण लोकांना आणखी चांगली सेवा कशी देऊ शकतो अशी विचारणाही नेहमी होते, असे मार्कने पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रश्नातून आपण बरेच काही शिकले असून, चांगली सेवा देण्यासाठी त्याची मदत होत असल्याचे मार्कने म्हटले आहे.

हीच परंपरा पुढे सुरू ठेवत फेसबूक यूझर्स आणि चाहत्यांना प्रश्न विचारता यावे यासाठी 'Q&A with Mark' नावाचे पेज तयार केले आहे. त्यावर कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारू शकता असे मार्कने म्हटले आहे. प्रश्न विचारण्याबरोबरच चांगल्या प्रश्नांना लाईक केल्यास मला चांगल्या प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाऊ शकेल, असेही मार्कने म्हटले आहे.

'Q&A with Mark' या पेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा...