आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Founder Mark Zukerbarg Bigger Donor At America

फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग अमेरिकेतील सर्वात दानशूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिटल- फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चॅन (2013) अमेरिकेतील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. कंपनीच्या नफ्यातील मोठा वाटा सिलिकॉन व्हॅलीला दान केला.

झुकेरबर्ग दांपत्याने 1 कोटी 80 लाख डॉलर्स एवढी रक्कम दान दिली आहे. एवढी मोठी रक्कम देणारे झुकेरबर्ग हे देशातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. क्रॉनिकल ऑफ फिलानथ्रॉपी मासिकाच्या अमेरिकेतील वार्षिक 50 दानशूरांच्या यादीत झुकेरबर्ग दांपत्याचा समावेश झाल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. 2013 मध्ये एवढी मोठी धर्मादाय रक्कम देणारे हे एकमेव दांपत्य आहे. दानाची ही रक्कम हयात असलेल्या दात्यांकडून आली आहे, हेच यंदाच्या यादीचे वैशिष्ट्य ठरले आहे, असे क्रॉनिकलच्या संपादकांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील काही मोठय़ा दानशूरांची नावे 2013 च्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत, कारण त्यांनी दान देणे बंद केले आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी गेट्स यांनी 181.3 दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम दान केली होती; परंतु त्याच्या पुढील वर्षी त्यांनी दान देणे बंद करून टाकले. दान बंद करून टाकणार्‍या व्यक्तींमध्ये सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर आणि बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष वॉरेन बफेट यांनीदेखील गेल्या वर्षी मोठी रक्कम दिली होती.

धर्मादाय चळवळीत किती व्यक्ती?
>2010 मध्ये बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांनी एकत्र येऊन गिव्हिंग प्लेज ही चळवळ सुरू केली. त्यात जगातील गर्भर्शीमंतांचा समावेश आहे. 120 श्रीमंत व्यक्ती किंवा संस्था त्यात आहेत.

>05 कोटीहून जास्त डॉलर्स एवढी रक्कम देणारे 42 दानशूर.

>30 दानशूरांचे कॉलेज, विद्यापीठांना निधी देण्यास प्राधान्य