Home | Business | Gadget | facebook, internet, photo sharing, iphone application

फोटो शेअरिंगसाठी आयफोन अँप

वृत्तसंस्था | Update - Jun 18, 2011, 03:30 AM IST

फोटो शेअरिंगमध्ये अगोदरच तगड्या समजल्या जाणार्‍या फेसबुकने धास्ती घेत चक्क नवीन आयफोन अँप्लिकेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • facebook, internet, photo sharing, iphone application

    वॉशिंग्टन: इंटरनेटवर विविध फोटो शेअररिंग करण्यासाठी फेसबुकला आता बाजारपेठेत स्पर्धेसाठी कोणीही नको आहे. कारण फोटो शेअरिंगमध्ये अगोदरच तगड्या समजल्या जाणार्‍या फेसबुकने धास्ती घेत चक्क नवीन आयफोन अँप्लिकेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
    सध्या नेटिझन्समध्ये लोकप्रिय आहे ती इन्स्टाग्राम सेवा. त्याचा वापर जगभरात किमान 50 लाख लोक करतात. ही सेवा मोठय़ा प्रमाणावर वापरली जात असल्याने फेसबुकसमोर हे आव्हान मानले जात आहे. ही लोकप्रियता फेसबुकला चिंता करायला लावणारी आहे.
    सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकला सध्यातरी विशेष स्पर्धेला सामोरे जावे लागत नाही. सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकचा सर्वाधिक वापर केला जातो. या व्यवहारामुळे फेसबुकला फोटो शेअरिंगही आपल्यामार्फत व्हावे, असे वाटत असेल तर गैर नाही. टेकक्रँचने दिलेल्या माहितीत या नवीन सुविधेमध्ये इन्स्टाग्रामपेक्षा किती नवे फिचर्स असतील याचा तपशील मात्र उपलब्ध नाही.Trending