आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुककडून वर्षभरात ४५ लाख नोक-या, १४ लाख कोटींचे योगदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकने गेल्या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत २२७ अब्ज डॉलरचे (सुमारे १४ लाख कोटीं) योगदान दिले असून या शिवाय ४५ लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या नोक-या दिल्या आहेत. डेलियाने फेसबुक्स ग्लोबल इकॉनॉमिक इम्पॅक्ट नावाने अहवाल जारी केला असून यात म्हटले आहे की, फेसबुकचे मार्केटींग, प्लॅटफॉर्म व कनेक्टिव्हिटीने जगभरातील लोकांना नोक-या देण्यास मदत झाली. फेसबुकचे सध्या १.३ अब्ज यूजर्स आहेत. प्रत्येक क्षेत्रात फेसबुकचा वापर वाढत आहे. त्यामुळे नोक-या उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे प्रमाण व व्यवसायदेखील वाढत आहे.