आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येशू ख्रिस्त काळातील भाषेचे 'फेसबुक' पेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरूसलेम- इस्रायलमध्ये एका तरुणाने प्राचीन भाषा आरामाइकमध्ये फेसबुकचे पेज तयार केले आहे. ही भाषा तीन हजार वर्षांपूर्वीची आहे. येशू ख्रिस्ताच्या काळात ही भाषा बोलली जात होती. फेसबुकच्या या पानावर स्टेट्स लिहिण्यास सांगण्यात आला आहे. हे पेज तयार होऊन पंधरा दिवस लोटले आहेत, असे हॉर्टेज वृत्तपत्राचे म्हणणे आहे. हे पेज सुरू करणार्‍या व्यक्तीने आपली ओळख गुप्त ठेवली आहे. लवकरच लष्करात नोकरी करणार आहोत. आरामाइकमध्ये फेसबुकला पाहणे, अनोखी गोष्ट आहे. आपले स्टेट्स, कविता, फिल्मी पोस्टर व्यंगात्मक रूपात सादर करण्याचे आवाहन संचालकाकडून करण्यात आले आहे.

स्टेट्स अपडेटमध्ये काय ?
आरामाइकमध्ये असलेल्या या पेजवर स्टेट्स अपडेट वेगळ्या प्रकारचा वाटतो. त्यात इंटरनेटवर असलेली माहिती देण्यात येत आहे. जी गाणी सध्या चलनात आहेत, त्याविषयी माहिती दिली जात आहे. त्यावर पहिला स्टेटस हिब्रूमध्ये लिहिण्यात आला होता. आरामाइकच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठीही काही लोक सल्ला देऊ लागले आहेत. अशा प्रकारचे पेज सर्वांनी मिळून कसे चालवले जात आहे, त्याची माहितीही त्यात आहे. त्याचबरोबर अनुवादासाठी मोठा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही त्यावरून जाहीर करण्यात आला आहे.

काय आहे सिफ्रा दी अनपिन ?
आरामाइक बोलीत फेसबुकला सिफ्रा दी अनपिन असे संबोधण्यात आले आहे. स्टेट्सला त्या भाषेत क्टिव्टा तर लाइकला हॅविवतई असे लिहिण्यात आले आहे.

मध्य-पूर्वेत प्रचलन
इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात आरामाइक ही भाषा मध्य-पूर्वेत बोलली जात होती. ग्रीक लोक आजही धार्मिक ग्रंथात याच भाषेतील पदे वाचतात.

पेजसाठी आवाहन
फेसबुकवरील या पेजवर कोणीही आपला स्टेट्स अपडेट करू शकतो. त्याचबरोबर त्यास पसंती कळवू शकतो, असे आवाहन संचालकांकडून करण्यात आले आहे.