आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Facebook Pays Bug Hunters $1 Mn; India 2nd Biggest Recipient

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेबसाईटवरील बग शोधाणा-यांना फेसबुकने मोजले 1 दशलक्ष डॉलर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आघाडीची सोशल नेटवर्कींग वेबसाईट फेसबुकने 'व्‍हायरस'ची माहिती देणा-यांना गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये जवळपास 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्‍कम अदा केली असून त्‍यात भारताचा वाटा दुस-या क्रमांकाचा आहे.

फेसबुक वेबसाईटवर सातत्‍याने व्‍हायरस हल्‍ले होत असतात. याशिवाय साईटवर इतरही बग्‍स येत असतात. त्‍यामुळे युझर्स त्रस्‍त होतात. अशा प्रकारे व्‍हायरस आणि बग्‍सची माहिती पुरविणा-या संशोधकांना फेसबुकने भरपूर पैसे मोजले आहेत. बग्‍स म्‍हणजे एखादे अप्‍लीकेशन किंवा सॉफ्टवेअरमधील त्रुटी. या त्रुटींमुळे अनेकदा ब्राऊझर क्रॅश होते किंवा काहीतरी त्रास होतो. त्‍यामुळे फेसबुकने 'बग बाऊंटी' नावाचा कार्यक्रम सुरु केला. अशाप्रकारच्‍या बग्‍सची माहिती देणा-यांना पैशांचा मोबदला देणे सुरु केले. दोन वर्षांपूर्वी हा कार्यक्रम सुरु झाला होता. आतापर्यंत 329 जणांना त्‍यातून मोबदला देण्‍यात आला आहे. त्‍यापैकी सर्वाधिक कमी वयाचा लाभार्थी एक 13 वर्षांचा मुलगा ठरला.

भारतात फेसबुकचे 7.8 कोटींपेक्षा जास्‍त यूझर्स आहेत. बग बाऊंटी कार्यक्रमात सर्वाधिक लाभार्थी अमेरिकेचे आहेत. तर भारताचा क्रमांक त्‍यानंतर लागतो. त्‍यानंतर तुर्की आणि जर्मनीचा क्रमांक आहे. एकूण 51 देशांमध्‍ये असे लाभार्थी आहेत. त्‍यांना 'बग हंटर्स' म्‍हणून ओळखले जाते.