आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटीला मेसेज पाठवण्यासाठी फेसबुक पैसे घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आपला आवडता सुपरस्टार किंवा गायक-गायिकांच्या थेट संपर्कात राहण्याचे सर्वात सोपे माध्यम म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्स. या माध्यमातून आपण त्यांना मेसेज पाठवू शकतो, त्यांच्याशी मैत्रीही करू शकतो.

सध्या जरी यासाठी तुमच्या खिशाला धक्का लागत नसला तरी यापुढे मात्र अशा सेलिब्रिटींशी मैत्री करण्यापूर्वी किंवा त्यांना मेसेज पाठवण्यापूर्वी तुम्हाला विचार करणे भाग आहे. कारण फेसबुकच्या माध्यमातून एखाद्या सेलिब्रिटीला मेसेज पाठवण्यासाठी यापुढे पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या युरोप आणि अमेरिकेत हा प्रयोग सुरू आहे.

हे शुल्क सेलिब्रिटीच्या प्रसिद्धीनुसार असेल. मात्र अशा एका मेसेजसाठी थोडेथोडके नव्हे तर किमान 10 पाउंड म्हणजे सुमारे 832 रुपये फेसबुक तुमच्याकडून वसूल करेल. सेलिब्रिटीच्या प्रसिद्धीच्या प्रमाणानुसार शुल्क वाढत जाईल.सध्या ब्रिटनसह एकूण 36 देशांमधील फेसबुक युजर्सवर याची चाचपणी फेसबुकने सुरू केली आहे. प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांना मेसेज पाठवायचा असल्यास, 10.08 पाउंड म्हणजे सुमारे 839 रुपये मोजावे लागतील, तर आॅलिम्पिक जलतरणपटू टॉम डेली याला मेसेज पाठवण्यासाठी 10.68 पाउंड म्हणजे सुमारे 890 रुपये मोजावे लागतील. याचप्रकारे प्रिन्स हॅरीची गर्लफ्रेंड किंवा इतर सेलिब्रिटीला मेसेज पाठवण्यासाठी शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. फेसबुकचे प्रवक्ते इयान मॅकेन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये हा प्रयोग सर्वप्रथम अमेरिकेत सुरू करण्यात आला. सध्या हा प्रयोग फक्त युरोपमध्ये सुरू आहे. तेथे या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर काही दिवसांनी हा प्रयोग पूर्ण सोशल नेटवर्कसाठी लागू करण्यात येणार आहे. विविध देशांमध्ये सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेनुसार त्यांना मेसेज पाठवण्यासाठी किंवा सेलिब्रिटीशी मैत्री करण्यासाठीचे शुल्क निर्धारित करण्यात येणार आहे. हे शुल्क कमी असावे, यासाठी विशेषज्ञांशी चर्चा केली जात असल्याचे इयान मॅकेन्झी यांनी सांगितले.