आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook To Use Satellites, Drones To Spread The Internet

जगातील अतिदूर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटीसाठी \'फेसबुक\' अवकाशात पाठवणार ड्रोन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- जगातील अतिदूर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी 'फेसबुक' आता सॅटेलाइट तसेच ड्रोन विमानाची मदत घेणार आहे. सोशल नेटवर्किंग साईट्‍समध्ये सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या 'फेसबुक'ने सांगितले, की नॅशनल एरोनोटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनेस्ट्रेशनची (नासा) जेट प्रपल्शन लॅब व अन्य अंतरिक्ष कम्युनिकेशन एक्सपर्ट्स या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहेत. जगाच्या कान्याकोपर्‍यात इंटरनेट पोहोचविणार्‍या या प्रकल्पाला 'कनेक्टव्हिटी लॅब' असे नाव देण्यात आहे.

'फेसबुक'चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, फेसबुकची 'कनेक्टिव्हिटी लॅब' विकसित करण्यासाठी ड्रोन, सॅटेलाइट आणि लेजर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. या माध्यमातून लवकरच अतिदूर्गम भागात इंटरनेट उपलब्ध करून दिले जाईल. परंतु, हा प्रकल्प कधी पूर्ण होईल, याबाबत झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले नाही.

जगाच्या कान्या कोपर्‍यात इंटरनेट पोहोचविण्यासाठी 'फेसबुक' आणि नेटवर्किंग कंपनी 'Internet.org' यांच्यात करार झाला आहे. 'कनेक्टिव्हिटी लॅब'च्या माध्यमातून आशिया-आफ्रीका खंडात ज्या भागात इंटरनेट नाही, अशा भागात इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, यासाठी आधी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे लागणार असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले.

पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन आणि जियोसिंक्रोनस सॅटेलाइट सोडले जाईल. त्यामाध्यमातून जगाच्या प्रत्येक भागात इंटरनेट पोहोचेल, असे झुकेरबर्ग म्हणाले. अवकाशात झेपावणार्‍या एअरक्राफ्ट्सद्वारा अदृश्य लेजर बीमदेखील जमिनीच्या दिशेने सोडले जाणार आहेत. त्यामाध्यमातून इंटरनेटचा स्पीड वाढविण्यास मदत होणार आहे.